छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्ह्यातील केजजवळ रविवारी १ कोटी ९७ लाख ६८ हजार रुपयांचे बाराशे ३५.५ किलो ग्रॅम वजनाचे चंदन पकडण्यात आले. या कारवाईत एकूण २ कोटी १८ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बालाजी जाधव या नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली.
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर तलाठी भरतीसंदर्भात मॅटचे “जैसे-थे”चे आदेश
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर : दोन खुनांच्या घटनांनी खळबळ
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार चंदनाचा मालक बालासाहेब दत्तात्रय उर्फ बालाजी जाधव आहे. तर चालक प्रियतम काशिनाथ साखरे (३४, रा. अंबाजोगाई), शंकर पंढरी राख (रा. कौडगाव ता. केज) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बालासाहेब जाधव यांच्या मालकीचे चोरीचे चंदन असून त्यांच्या सांगण्यावरून केजवरून धारूर मार्गे जालन्याकडे नेण्यात येत होती. भाजीपाल्याच्या कॅरेटच्या आडून या चंदनाची तस्करी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सागितले.