छत्रपती संभाजीनगर: क्रांतीचौक परिसरातील संसारनगरात रविवारी पहाटे एका २४ वर्षीय तरूणाचा खून झाल्याची घटना समोर आली असून, मृत तरुणाच्या मित्रांनीच त्याला संपवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी करून आक्रोश करत आरोपींच्या अटकेची मागणी केली. यावेळी रूग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्पेश विजय रूपेकर (वय २४, रा. क्रांतीनगर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश हा आई वडील, एक मोठा भाऊ आणि तीन बहिणींसह क्रांतीनगरात राहत होता. शहरातील एका महाविद्यालयात तो पदवीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. शनिवारी दुपारी त्याचा काही जणांसोबत वाद झाला. त्यानंतर रात्री उशीरा तो कुटूंबासह पोलिस ठाण्यातही आला होता. मात्र रात्री उशीरा तीन वाजेच्या सुमारास संसारनगरात तो रस्त्यावर पडल्याची माहिती कुटूंबाला मिळाली. कुटूंबीयांनी धाव घेत अत्यवस्थ अवस्थेत त्याला घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. कल्पेशचा गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे.