छत्रपती संभाजीनगर – शहरातील चिकलठाणा भागातील मिनी घाटी परिसरात दोन गटांमध्ये रात्री घोषणा देण्यावरून वाद झाला. घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला असून, हेल्मेट घातलेल्या पोलिसांनी लाठी हातात घेऊन वाद घालणाऱ्या दोन्ही गटातील तरुणांना हुसकावले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त नवनीत कांवत, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, चिकलठाणा औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक पाथारे यांच्यासह मोठा ताफा आहे.

काही राजकीय नेत्यांनीही भेट देऊन संबंधित तरुणांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली. काही वरिष्ठ नेत्यांनीही फोन करून माहिती घेतल्याचे काही राजकीय पक्षाशी संबंधित तरुण नेत्यांनी सांगितले.  दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पोलीस उपायुक्त नवतीत कांवत यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तर सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी घटनेबाबत सांगितले की, काही उथळ तरुणांमुळे वादाला तोंड फुटले. वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. परिस्थिती नियंत्रणात आहे.

Story img Loader