स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उद्दिष्टपूर्ती न झालेल्या ग्रामसेवकांना दंड आकारण्याची कारवाई बारगळली. आता ग्रामसेवकांना नोटीसा देण्याचे ठरविण्यात आले असले तरी जिल्ह्यातील तीन नगर पालिकांचे काम कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे.
या वर्षी स्वच्छ भारत मिशनमध्ये १२ हजार स्वच्छतागृह बांधकामाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. गावोगाव वरिष्ठ कक्षाधिकारी व कर्मचारी भेट देऊन ग्रामस्थांना स्वच्छतागृहाचे महत्त्व पटवून सांगत गेले. गाव किती दिवसात पादंणमुक्त करणार, याची अश्वासने ग्रामस्थांकडून घेतली गेली. मात्र, ही मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. स्वच्छतागृह बांधकामाच्या मागे ग्रामसेवकांना ५० रुपये दंड आकारण्याचे ठरले होते. दंडाची रक्कम साडेतीन लाख रुपये जमा होईल, असे सांगितले जात होते. मात्र, तसे घडले नाही. आता ७३ ग्रामसेवकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.
िहगोली शहरात पूर्वी दररोज घंटागाडीने स्वच्छता होत गेल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले. मात्र, त्या गाडय़ा बंद झाल्या. शहरात प्रभाग क्रमांक ३ मध्ये तर घंटागाडी कागदावरच सुरू आहे. ओला व सुका कचरा वेगळा केला जात असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात कारवाई होत नाही. कळमनुरीमध्येही स्वच्छता मोहिमेचा फज्जा उडाला आहे.

Story img Loader