थंडीची चाहूल हळूहळू जाणवू लागली असतानाच जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रताही वाढत असल्याचे चित्र आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्य़ातील ७७ गावांना १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी ४० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रामुख्याने पैठण, गंगापूर व वैजापूर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठय़ाचे प्रमाण अधिक आहे.
पैठण तालुक्यातील ३३ गावांसाठी ५३, गंगापूर २२ गावांसाठी २५, वैजापूर २० गावांसाठी २२, तर कन्नड २ गावांसाठी १ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पैठणमध्ये १७ तर वैजापूरमध्ये २२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. औरंगाबाद, फुलंब्री, खुलताबाद, सिल्लोड व सोयगाव तालुक्यात अजून टँकर सुरू नसले, तरी टंचाईची तीव्रता सुरू झाल्यास लवकरच येथेही टँकर सुरू होतील, असे सांगण्यात येते.

Story img Loader