छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणाला मारहाण केल्यावरून दोन गट रविवारी रात्री १० च्या सुमारास समोरासमोर आले आणि जोरदार घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. दोन्ही गटातील काही नेतेही दाखल झाल्याने सुमारे पाचशे ते सहाशेंचा जमाव एकत्र आला होता.

दरम्यान लाईट गेल्याने काही दुकाने व घरावर दगडफेक केली. मात्र ही किरकोळ दगडफेक असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. दोन्ही गटाकडून गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच काही पदाधिकारी सामंजस्याने वाद मिटवण्याचेही प्रयत्न करत असल्याचे जमावातील काही तरुणांनी सांगितले.

Story img Loader