मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये करोनामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दिवसागणिक करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. मागील २४ तासांत औरंगाबादमध्ये ९० नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या ४६८ इतकी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औरंगाबाद सध्या रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी शहरात संचारबंदी आणि इतरही उपायांचा अवलंब केला जात आहे. दुसरीकडं शहरातील करोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. आज वाढलेल्या रूग्णांमध्ये एसआरपीएफ कॅम्प(72) जयभीम नगर (4),बेगमपुरा(4), भीमनगर,भावसिंगपुरा(1) शाह बाजार (1) ध्यान नगर, गारखेडा (1)एन-2 लघु वदन कॉलनी, मुकुंदवाडी(1)बायजीपुरा (3)कटकट गेट(1),सिकंदर पार्क आणि (1)खुलताबाद(1) येथील नागरिकांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित 468 झालेत.
आज वाढलेले(90 रुग्ण)-(कंसात रुग्ण संख्या) एसआरपीएफ कॅम्प(72) जयभीम नगर (4),बेगमपुरा(4), भीमनगर,भावसिंगपुरा(1) शाह बाजार (1) ध्यान नगर, गारखेडा (1)एन-2 लघु वदन कॉलनी, मुकुंदवाडी(1)बायजीपुरा (3)कटकट गेट(1),सिकंदर पार्क(1)खुलताबाद(1)
-मिनी घाटी pic.twitter.com/FYEz6sMEHn

— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) May 8, 2020

करोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या जिल्ह्यात मुंबई, पुणे, मालेगावनंतर आता औरंगाबाद शहराचा नंबर लागला आहे. शहरात १३ मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. मात्र, मार्च महिन्यात एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. शिवाय पहिली महिला रुग्ण ही उपचाराअंती ठणठणीत बरी होऊन घरी परतली. त्यामुळे औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. दरम्यान शहरात २९ पर्यंत हॉटस्पॉटही वाढले आहेत. शहरातील किलेअर्क, नूर कॉलनी, आसिफिया कॉलनी,भीमनगर, सातारा परिसर, देवळाई, समतानगर या परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळून आले. परंतु, २१ मार्च ते १ मेपर्यंत शहरातील इतर परिसरात करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून यामध्ये नुर कॉलनी, मुकुंदवाडी, संजयनगर, भीमनगर भावसिंगपुरा या भागात मोठ्या संख्येनं करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहरात दाट लोकवस्तीच्या काळात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे शहरवासीयांची चिंता वाढली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus update aurangabad total 468 nck