शहरात पाणीटंचाईसह अनेक प्रश्नांनी तीव्र स्वरूप धारण केले असताना मनपातील नगरसेवक मात्र केरळच्या सहलीवर निघाले आहेत. याचा निषेध म्हणून भाजपच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले.
युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव मदने, महिला आघाडीच्या अध्यक्षा गीता गौड, अल्पसंख्याक आघाडीचे अफजलखान पठाण आदींनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. साडेतीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेचे महापालिकेत रुपांतर झाले. शहरवासीय अनेक नागरी सुविधांपासून मात्र वंचितच आहेत. गेल्या काही वर्षांपासून पाऊस कमी होत असल्यामुळे पाणीटंचाईची समस्या भीषण आहे. विकासकामे रेंगाळली आहेत. नागरिकांना अनेक गरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. या बाबत उपाययोजना करण्यात नगरसेवक व पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. अशा अडचणीच्या काळात प्रशिक्षणाच्या नावाखाली केरळला सहलीस निघालेले नगरसेवक पशाचा चुराडा करीत आहेत. ऐपत नसताना पालिका करीत असलेल्या नियोजनाविरोधात भीक मागो आंदोलन करून हे पसे पालिकेला सुपूर्द करण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. उपमहापौर कैलास कांबळे यांच्या अंगावर चिल्लर पसे फेकण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा