अस्थिव्यंग विद्यालयातील सात कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना समाजकल्याण अधिकारी कार्यालयातील सामाजिक कार्यकर्ता प्रशांत एकनाथ गायकवाड यास शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले.
परभणीच्या अस्थिव्यंग विद्यालयातील सात कर्मचाऱ्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली. मान्यता मिळाल्यापासूनचे वेतन काढण्यासाठी संस्थाचालकाने जि. प. च्या अपंग विभागातील जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव टाकला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी या कार्यालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता प्रशांत एकनाथ गायकवाड याने संस्थाचालकाला दीड लाख रुपये लाच मागितली. या बाबत संस्थाचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीवरून अपंग विभागाच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. या वेळी तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच घेताना गायकवाडला पकडण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Story img Loader