महिला तलाठय़ाकडे बदलीची शिफारस करण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तसेच देगलूर तहसीलदार जीवराज डापकर यांच्याविरुद्ध बुधवारी संध्याकाळी देगलूर पोलीस स्थानकात अनुसूचित जाती-जमातीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात दोन्ही आरोपीविरुद्ध बुधवारी मध्यरात्रीनंतर अॅट्रॉसिटी कलम ३ (१), ११, १२ वाढविण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी दिली.
अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्य़ासाठी अनेक आंबेडकरी संघटनांनी मोच्रे काढून पाठपुरावा केला होता. देगलूर तालुक्यातील महिला तलाठय़ाची आंतरजिल्हा बदली करण्याची शिफारस करण्यासाठी स्वामी व डापकर यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार महिला तलाठय़ाने पुराव्यासह पोलीस अधीक्षकांकडे केली. त्यानंतर या दोघांविरुद्ध देगलूर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महिला तलाठी दलित असल्याकारणाने आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, या साठी अनेक आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. अखेर अनेक दिवसांच्या दबावानंतर बुधवारी रात्री उशिरा दोघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचे कलम लावण्यात आले.
विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांकडून जामीन देण्यात आला. या प्रकरणी चुकीचे कलम लावून आरोपींना जामीन देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा