मुरुमाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे साडेतीन हजार रुपयांप्रमाणे दोन महिन्यांचे सात हजार रुपये, तसेच पकडलेले वाहन सोडण्याचे वेगळे तीन हजार अशी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्ह्य़ातील लिंबेजळगाव (तालुका गंगापूर) सज्जाचा तलाठी विनोद पद्माकर क्षीरसागर या लाचखोराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. गंगापूर येथे चहाच्या टपरीवर गेल्या आठवडय़ात (२५ जानेवारी) ही कारवाई करण्यात आली होती.
यातील तक्रारदार लिंबेजळगावचे राहणारे असून, टेंभापुरी (जिल्हा औरंगाबाद) येथील जलसिंचन शाखेच्या शाखाधिकाऱ्याकडून टेंभापुरी मध्यम प्रकल्पातून मुरुम व गाळपेरा काढण्याची परवानगी त्यांनी घेतली आहे. त्यांच्या टिप्परमधून ते मुरुम वाहतूक करीत असताना २० जानेवारीला तलाठी क्षीरसागर याने त्यांचे वाहन थांबवून तुम्ही अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करीत आहात, असे सांगून हद्दीतून मुरुम वाहतूक करायची असल्यास १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने तक्रार करताच लाचलुचपत विभागाने २५ जानेवारीला पडताळणी केली व लाच घेताना क्षीरसागर याला पकडले होते. त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचखोर तलाठय़ाविरुद्ध गुन्हा
मुरुमाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे साडेतीन हजार रुपयांप्रमाणे दोन महिन्यांचे सात हजार रुपये, तसेच पकडलेले वाहन सोडण्याचे वेगळे तीन हजार अशी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्ह्य़ातील लिंबेजळगाव (तालुका गंगापूर) सज्जाचा तलाठी विनोद पद्माकर क्षीरसागर या लाचखोराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-02-2016 at 01:20 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime on corrupt talathi