छत्रपती संभाजीनगर – एटीएम चोरून नेण्याच्या उद्देशाने खिळे गॅस कटरने कापताना अचानक आग लागली. या आगीत एमटीएममधील नोटा जळून खाक झाल्या. ही घटना माळीवाडा परिसरातील मुख्य रस्त्यावरील एसबीआय बँकेच्या एमटीएममध्ये सोमवारी पहाटे घडली. घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याचे एक पथक दाखल झाले.
हेही वाचा >>> हिंगोलीसह वसमत, कळमनुरी औंढा नागनाथ तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले; भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल ४.५
एमटीएममध्ये किती रक्कम होती, याची सायंकाळपर्यंत माहिती घेण्याचे काम सुरू होते. चोरटे कारमधून आल्याचे काही सीसीटिव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. रक्कम तपासून आणि तपशील घेऊनच तक्रार दाखल होईल आणि त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, वाळूज पोलिसांनी एमटीएममधील बॅटऱ्या चोरून नेणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अकाेला जिल्ह्यातून ताब्यात घेतले.
भगवान विश्वनाथ सदार आणि जगदिश जगदेव हिवराळे (रा. चतारी ता. पातूर), अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. या दोघांनी ४ जुलै रोजी लिंबेजळगाव येथील महाराष्ट्र बँकेच्या तुर्काबाद शाखेच्या एटीएमच्या बॅटऱ्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी तुर्काबाद खराडी बँक शाखेचे व्यवस्थापक राहुल सूर्यभान डोंगरे यांनी ४ जुलै रोजी वाळूज ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक विशेष शाखेचे एक पथक तयार करण्यात आले होते. पथकाने विविध भागात तांत्रिक तपास केला असता आरोपी सिंदखेडराजा न्यायालयात येत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस उपनिरीक्ष अजय शितोळे यांनी पथकातील सहकाऱ्यांसह सिंदखेडराजा येथील न्यायालय परिसरात पोहेचले असता आरोपी तेथे आलेच नाहीत. त्यांचा माग काढला असता ते अकोला जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच त्यांना ताब्यात घेण्यात आले.