छत्रपती संभाजीनगर – घरगुती सिलिंडर गळती होऊन लागलेल्या आगीत सांसारिक साहित्यासह कपडे आदी वस्तूंचे नुकसान झाले. गुरुवारी सायंकाळी ही घटना बायजीपुरा भागातील इंदिरानगरातल्या गल्ली क्र. १२ मध्ये घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेची माहिती पदमपुरा अग्निशमन केंद्राला दिल्यानंतर घटनास्थळी सिडको अग्निशामक केंद्राचे पथक दाखल झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र अधिकारी आर. के. सुरे, उपअग्निशमन केंद्र अधिकारी भगात, ड्युटी अधिकारी एस. एस. कुलकर्णी, वाहनचालक अब्दुल हमीद आदींनी आग आटोक्यात आणली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damage to household goods including clothes etc in fires caused by leaking household cylinders amy