लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
छत्रपती संभाजीनगर : पवन ऊर्जा क्षेत्रातील अवादा एनर्जी कंपनीचे केज तालुक्यात होत असलेले काम बंद करा, काम सुरू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या, अन्यथा हात-पाय तोडू, अशी धमकी दिल्याप्रकरणी परळीचे वाल्मीक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अवादा एनर्जी कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील केदू शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वाल्मीक कराड यांनी २९ नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून अरे ते मस्साजोग येथे सुरू असलेले काम आधी बंद करा, सुदर्शनने (घुले) सांगितले त्या परिस्थितीतील काम बंद करा अन्यथा गंभीर परिणाम होतील, असे धमकावले. तसेच सुदर्शन घुलेनेही मस्साजोग येथील कंपनीच्या कार्यालयात येऊन हात-पाय तोडू अशी धमकी दिली होती. त्यानंतर कंपनीतील सहकारी आणि जमीन अधिग्रहणाचे काम पाहणारे शिवाजी थोपटे यांना वाल्मीक कराड यांनी त्यांच्या परळी येथील कार्यालयात बोलवून घेतले. अवादा कंपनीचे केज तालुक्यात सुरू असलेले काम बंद करा, अन्यथा काम सुरू ठेवायचे असेल तर २ कोटी रुपये द्या, असे धमकावल्याचे सुनील केदू शिंदे यांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
आणखी वाचा-परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
तत्पूर्वी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करून घटनेचा केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) मार्फत तपास करावा अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन केली होती. सरपंच संतोष देशमुख व याप्रकरणात वाल्मीक कराड यांच्यासोबतच गुन्हा दाखल झालेला सुदर्शन घुले याच्या विरोधात यापुर्वीही गुन्हा दाखल झाला आहे.