छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एक मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी १३ ऑक्टोबरला सकाळी साडे सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. साहिल शीलवंत नांदेडकर १७ असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहिलने त्याच्या आई-वडीलांसोबत जेवण केले. त्यानंतर त्याने आई-वडीलांसाेबत रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या. रात्री उशीरा तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. सकाळी त्याचे वडील त्याला उठविण्यासाठी गेले असता, त्याने त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. दरवाजा उघडत नसल्याने वडील खिडकीतून आवाज देण्यासाठी गेले असता, साहिलने गळफास घेतल्याचे दिसले. साहिलच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नाेंद करण्यात आली आहे. साहिल हा १२ वी विज्ञान शाखेत शिकत होता.