छत्रपती संभाजीनगर : धाराशिवचे राजकीय ‘ऑपरेशन टायगर’ स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. यापूर्वी दोनवेळा ‘वाघ’ जाळ्यात अडकला होता. मात्र, योग्य ठिकाणी इंजेक्शन न दिल्याने तो सुटला. आता स्वत: शिंदेंच्या टप्प्यात सावज आले की, कार्यक्रम करणार आहेत, या शब्दांत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा राजकीय घडामोडींचे संकेत दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धाराशिव जिल्ह्यात शिवसेना उबाठा गटातील धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील व उमरगा येथील प्रवीण स्वामी हे आमदार आहेत. स्वामी हे पहिल्यांदा आमदार झाले आहेत. मात्र कैलास पाटील यांची यंदा दुसरी टर्म आहे. सत्ता परिवर्तनाच्या वेळी आमदार कैलास पाटील हे गुवाहाटीला जात असताना सुरतच्या अलीकडून वापस आले होते. कैलास पाटील हे शिंदे गटाच्या रडारवर आहेत, असे सध्या चित्र दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे बारा आमदार मंत्री झाले आहेत. त्यामुळे ऑपरेशन टायगरची जबाबदारी सर्वांवरच आहे. धाराशिव जिल्ह्यात ऑपरेशन टायगरचे दोनवेळा प्रयत्न झाले आहेत. मात्र, ते त्यावेळी जाळ्यात आले नाहीत, म्हणजेच त्यावेळी योग्य जागी ‘इंजेक्शन’ लागले नाही.