धाराशिव : शेतात विहिरीतील पाणी देण्यावरून झालेल्या हाणामारीत पारधी समाजाच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. वाशी तालुक्यातील बावी गावात शेताच्या बांधावरून काळे कुटुंबात वाद सुरू होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : बाहुबलीचे बीड : ‘विहिरी’तील कोट्यवधींच्या घबाडावर बाहुबली गब्बर, राखेतील परळीत ‘शांतता राखा’!

रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास काळे कुटुंबातील काका, पुतणे, नणंद यांच्यात विहिरीतील पाणी शेताला देण्यावरून वाद झाला. यावेळी काठी, कोयता व पट्ट्याने एकमेकांवर वार करण्यात आले. त्यात अप्पा काळे (वय ६५ वर्ष), सुनील काळे (वय २० वर्ष), परमेश्वर काळे (वय २२ वर्ष) या तिघांचा मृ्त्यू झाला आहे, तर वैजाबाई काळे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी येरमाळा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharashiv pardhi family clashes three killed one woman injured in farm water dispute koyta attack css