धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे पोटच्या मुलाला व मुलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता. २४ रोजी सायंकाळी घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राधिका गणेश घट्टे (वय २५) हिने श्रेया गणेश घट्टे (वय २) व श्रेयस गणेश घट्टे वय (४ महिने) या बालकांना घरातील वेगवेगळ्या पाण्याच्या ड्रम मध्ये बुडविले. स्वतः घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयत राधिका हिच्या दिराने नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा : मराठवाडा : ४६ पैकी ४० जागांवर महायुतीचा भगवा, महायुतीचे ‘रक्षाबंधन’! भाजपची विजयाची कमान चढती
काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नळदुर्ग येथील आरोग्य केंद्रात तिघांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. ता.२५ रोजी दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घट्टेवाडी येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
© The Indian Express (P) Ltd