छत्रपती संभाजीनगर : विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे महसूल राज्यमंत्री असतानाच्या कार्यकाळातील शहरामधील एका वादग्रस्त जागेच्या प्रकरणात मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांना व्यक्तीशः अवमानना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट व न्या. संजय देशमुख यांनी गुरुवारी दिले. जागेचे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असताना आणि कोणत्याही कारवाईला संरक्षण असताना, त्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न म्हणजे यापूर्वीच्या आदेशाचा अवमान असल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. पुढील सुनावणी सोमवारी (१९ जून) ठेवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रकरणात, शेख उमर शेख चाँंद, मसूद अहमद जमील अहमद व इतरांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, त्यांच्या मालकीची बुढीलेन भागातील सर्व्हे नं. ३१९४ मधील सात हजार १८६ चौरस मीटर जागा आहे. यातील एक हजार ७८४ चौरस मीटर जागा ही शेख मसूद यांची तर उर्वरीत जागा ही शेख हसनोद्दीन कमाल व शेख उमर यांची आहे. मात्र, संबंधित जागा ही आपली असून त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, असा एक अर्ज विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार व त्यांचा मुलगा समीर सत्तार यांनी २२ डिसेंबर २०२० रोजी मनपाकडे दिला होता. त्यावर याचिकाकर्त्यांनी खंडपीठात धाव घेतली.

हेही वाचा >>> सोलापूर : सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी अखेर जमीनदोस्त

तत्कालीन न्या. संजय गंगापूरवाला आणि  न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी जागेला अंतरिम संरक्षण दिले. हे आदेश ८ जून २०२३ पर्यंत कायम होते. ही याचिका निकाली काढताना खंडपीठाने या प्रकरणी दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचे सूचित केले तसेच अंतरिम संरक्षण ४५ दिवस वाढविले. तसेच याचिकाकर्त्यांच्या जागेच्या प्रश्नी मनपाला सुनावणी घेण्याचे आदेश दिले. मात्र, आजच या जागेचा ताबा घेण्यासाठी मनपाचे अधिकारी, पोलीसही पथकासह संबंधित ठिकाणी दाखल झाले होते.

यावर  महानगरपालिकेने तातडीने म्हणजे १४ जून २०२३ रोजी याचिकाकर्त्यांना नोटीस काढून १६ जून रोजी सुनावणी निश्चित केली. मात्र जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याने याचिकाकर्त्यांनी खंडपीठात तातडीने अवमान याचिका दाखल केली. न्यायप्रविष्ट असलेल्या आणि सुनावणी प्रलंबित असलेल्या प्रकरणात जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खंडपीठाने महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना व्यक्तिशः अवमानना नोटीस बजावली  असल्याची माहिती  याचिकाकर्त्यांचे वकील ऍड. ए. टी. पटेल यांनी दिली. या प्रकरणी ॲड. पटेल यांना ॲड. संकेत कुलकर्णी यांनी सहकार्य केले.