सविता पानट यांचे २२ वर्षांपासूनचे सेवाकार्य
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तो चिमुकला जीव कोणी तरी काटय़ाकुटय़ात टाकून दिला होता. त्या बाळाचे पूर्ण अंग जखमांनी भरले होते. अगदी चेहऱ्यावरही काटे घुसले होते. तिचे निरागस डोळे त्या वेदना सहन करून थकले होते. रडण्याचा आवाज क्षीण झाला होता. तेव्हा ती ‘साकार’मध्ये आली. तेव्हा तिच्यावर तातडीने उपचाराची गरज होती. मोठय़ा कष्टाने सगळ्यांनी मिळून तिला वाढवली. तिच्या डोळ्यात आता भाव आले होते. ती तिला वाचविणाऱ्यांना ओळखू लागली होती. तिचे हसू कार्यकर्त्यांना बळ देणारे होते. पुढे तिला दत्तक घेणारे एक जोडपे पुढे आले. तिला तिचे आई-बाबा मिळाले होते. कार्यकर्त्यांचा आनंद दुणावला होता. संस्थेत आलेल्या मुलांची कहाणी ‘साकार’च्या सविता पानट आणि नीलिमा सुभेदार सांगत होत्या. तेव्हा या कामाची गरज किती मोठी आहे हे लक्षात येत होते. औरंगाबाद शहरात अशा मुलांना घर मिळवून देण्याचे काम ‘साकार’ संस्थेच्या वतीने गेल्या २२ वर्षांपासून करते आहे.
‘साकार’ ही काही टाकून दिलेल्या मुलांना सांभाळ करणारे वसतिगृह नाही. या मुलांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, यासाठी पालकांनी मूल दत्तक घ्यावे, हा संदेश देणारी संस्था आहे. मूल फेकून देताना त्या जन्म देणाऱ्या आईला किती वेदना होत असतील? बऱ्याचदा नकळत्या वयात कुमारी मातांची ही मुलं असतात. बऱ्याचदा ती अल्पवयातील मातांची असतात. परिणामी टाकलेलं मूल कधीच सुदृढ असत नाही. एखादे फार क्वचित! एका वेळी ‘साकार’मध्ये २०-२२ मूल असतात. बहुतेकांचे वय पाळण्यातले. त्यामुळे लंगोटापासून ते दुधापर्यंतचे सगळे काही करणे मोठे जिकिरीचे काम. एखाद्या घरात एक लहान मूल असेल तर सगळे घर कामाला लागलेले असते. इथे एका वेळी २०-२२ जण. त्यामुळे सर्वाना सांभाळ करताना आयांची मोठी कसरत सुरू असते. एका मुलाला साधी सर्दी झाली तर ती दुसऱ्याला होण्याची शक्यता. त्यामुळे कितीही काळजी घेतली तरी मुलांसाठी लागणारा औषधोपचाराचा खर्च खूप मोठा आहे. संस्थेला सरकारी अनुदान मिळते, पण ते कमालीचे तुटपुंजे आहे. वर्षांला दोन ते सव्वादोन लाख रुपयांच्या या अनुदानातून ही संस्था चालविणेच अवघड. त्यामुळे अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. नीलिमा सुभेदार सांगत होत्या, आपल्याकडे मदत करण्याची आगळीच पद्धत आहे. बहुतेकांना महिन्याचा किराणा भरून देण्यात रस असतो. या संस्थेतील मुलं एवढी लहान आहेत की, त्यांच्यावरील दुधाचा खर्च अधिक आहे. खरी गरज असते ती डेटॉल किंवा फिनाईलसारख्या स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची. अलीकडे प्रबोधनामुळे फरक पडला आहे. पण संस्थेची गरज ही औषधोपचारासाठी लागणाऱ्या पैशांची आहे. एखाद वेळी एखाद्या मुलाला वाचविताना लाखभर रुपये एका फटक्यात खर्च होतात. बऱ्याचदा कोणी तरी धाऊन येते, पण पूर्ण वेळ बालरोगतज्ज्ञ ही संस्थेची निकड आहे. आया आणि बालरोगतज्ज्ञांच्या जोरावर संस्थेचे काम नीटपणे सुरू आहे.
देशभरात दरवर्षी ६ हजार मुलांना घर मिळते. विशेषत: विदेशात दत्तक घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. टाकून दिलेली अनेक चिमुकली मुले ‘साकार’च्या प्रयत्नांमुळे विदेशातही दत्तक गेली आहेत. जी मुले दत्तक गेली नाहीत. त्यांचा सांभाळ करताना त्यांच्या नामकरणापासून ते त्यांच्या गणवेशापर्यंतची सगळी तयारी संस्थेत केली जाते. जी मुले गतिमंद आहेत त्यांचा सांभाळ करण्यासाठी दायींना विशेष प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेत आता २५ कर्मचारी काम करत आहेत. त्यातील आयांना दरवर्षी दोनदा प्रशिक्षण दिले जाते. हे सगळे करताना जाणवणारी आर्थिक चणचण मोठी असते. संस्थेची स्वत:ची इमारत झाली तर दर महिन्याला दिला जाणारा ३० हजार रुपयांचे भाडे वाचणार आहे.