मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सातव्या लेखिका साहित्य संमेलनासाठी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांची निवड करण्यात आली आहे. हे लेखिका संमेलन ६ व ७ फेब्रुवारी २०१६ रोजी उस्मानाबाद येथे होणार आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी परिषदेच्या डॉ. नांदापूरकर सभागृहात परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर बढे, दादा गोरे, मधुकर मुळे, डॉ. शेषराव मोहिते, आसाराम लोमटे, देविदास फुलारी, नितीन तावडे इ. सदस्य यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत थोर कथा-कादंबरीकार रा. रं. बोराडे यांच्या बयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभीष्ठचिंतन करणारा ठराव घेण्यात आला. लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती किन्हाळकर या प्रसिद्ध कवयित्री असून वेदन, तारी, हे त्यांचे कवितासंग्रह आणि सहजरंग, संवेद्य हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या किन्हाळकर यांना साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे पुरस्कार लाभले आहेत.
लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वृषाली किन्हाळकर
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सातव्या लेखिका साहित्य संमेलनासाठी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
Written by दया ठोंबरे
आणखी वाचा
First published on: 04-01-2016 at 01:50 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr vrushali kinhalkar president women literature meet