मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सातव्या लेखिका साहित्य संमेलनासाठी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांची निवड करण्यात आली आहे. हे लेखिका संमेलन ६ व ७ फेब्रुवारी २०१६ रोजी उस्मानाबाद येथे होणार आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी परिषदेच्या डॉ. नांदापूरकर सभागृहात परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर बढे, दादा गोरे, मधुकर मुळे, डॉ. शेषराव मोहिते, आसाराम लोमटे, देविदास फुलारी, नितीन तावडे इ. सदस्य यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत थोर कथा-कादंबरीकार रा. रं. बोराडे यांच्या बयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभीष्ठचिंतन करणारा ठराव घेण्यात आला. लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती किन्हाळकर या प्रसिद्ध कवयित्री असून वेदन, तारी, हे त्यांचे कवितासंग्रह आणि सहजरंग, संवेद्य हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या किन्हाळकर यांना साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे पुरस्कार लाभले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा