छत्रपती संभाजीनगर – पैठण येथील जायकवाडी प्रकल्पावर मंगळवारी रात्री दहानंतर चार ते पाच ड्रोन भिरभिरताना आढळून आले. या प्रकाराने खळबळ उडाली. ड्रोनद्वारे टेहळणीचा प्रकार आहे, याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. या घटनेमुळे जायकवाडीवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकारी अभियंत्यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क करून टेहळणीच्या प्रकाराची माहिती दिल्याचे धरण परिसरातील सूत्रांनी सांगितले. धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले की, रात्री धरण परिसरात काही ड्रोन टेहळणी करताना आढळून आले. याची माहिती विभागातील वरिष्ठांना देण्यात आली. या पार्श्वभूमीवर पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवरूनही खबरदारीच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.