एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. या अभूतपूर्व बंडखोरीनंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून राज्यभर शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठीही नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपा-शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तशी माहिती शिंदे गटातील स्थानिक नेते तथा औरंगाबाद महापालिकेचे माजी महापौर राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थकही स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> बंडखोर खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेत प्रवेश

औरंगाबाद महापालिकेची निविडणूक लवकरच होण्यची शक्यता आहे. असे असताना शिंदे गट आणि भाजपा हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. “औरंगाबाद महापालिकेची निवडणूक भाजपा आणि शिंदे गट आम्ही एकत्र लढवणार आहोत. हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्द्यांना घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जागावाटपाचा निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार घेण्यात येईल. तशी आमची तयारी झालेली आहे,” असे जंजाळ यांनी टीव्ही ९ मराठीला सांगितले.

हेही वाचा >> शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी, उद्धव ठाकरेंनी सर्वांसमोर केली घोषणा

“शहराचा विकास झाला पाहिजे, अशी लोकांची इच्छा आहे. पण शहराच्या विकासासाठी जो निधी हवा आहे, तो पालिकेकडे नाही. राज्य सरकारकडूनच हा निधी घेता येईल. राज्य सरकार आमचे आहे. राज्य सरकार भाजपा आणि शिवसेना यांच्याकडून एकत्रीतपणे चालवले जात आहे. महापालिका आमच्या ताब्यात असेल,” असा विश्वासही जंजाळ यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >> “धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना शोभणारे नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका”

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे समर्थक ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. “शिवसेना पक्ष तयारी सुरु केली आहे. शिंदे गट आणि भाजपा एकत्र येत असतील शिवसेनेसाठी चांगली गोष्ट आहे. राष्ट्रवादी किंवा काँग्रेसशी आमची युती होणार की नाही हा पुढचा प्रश्न आहे. सध्यातरी शिवसेनेने सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे,” अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde group and bjp will contest aurangabad municipal election together prd