महिलांना स्वत:पेक्षाही परिवार महत्त्वाचा असतो. ती आपल्यापेक्षा इतरांचा विचार अधिक करीत असल्याने कठीण स्थितीतही संघर्ष करून जगते. महिलेची बचत कुटुंबासाठी असते, कमी पशातही बचत करून ती कुटुंबाला अडचणीच्या काळात आधार देते, हा प्रत्येक घरातला अनुभव आहे. महिलांमधील ही क्षमता विकसित करून त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी सरकारने जीवनोन्नती अभियान सुरू केले आहे. महिला सक्षम झाली तरच समाज सक्षम होईल, या साठी सरकारच्या सर्व योजना ग्रामीण भागातील महिलेपर्यंत पोहोचवणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
ग्रामविकास विभागाच्या जीवनोन्नती अभियानांतर्गत येथे सोमवारी उमेद महिला जनजागृती मेळाव्याचे उद्घाटन मुंडे यांच्या उपस्थितीत झाले. अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, विशेष कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, उपायुक्त डॉ.अशोक कोल्हे, अशोक शिरसे आदी उपस्थित होते. विभागातून मेळाव्यास ५ हजारांपेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन या वेळी भरवण्यात आले. अनेक जिल्ह्यांतील महिलांनी आपली यशोगाथा सांगितली. विविध अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनही केले.
महिलेला उंबऱ्याच्या आत व बाहेर वेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. वर्षांनुवष्रे महिलांना आपल्या हक्कापासून दूर ठेवण्यात आले. काळ बदलला तरी आजही हक्कांसाठीच लढावे लागते. उपजतच महिलांमध्ये स्वत:पेक्षा इतरांचा विचार करण्याचा गुण असतो. त्यामुळे प्रत्येक महिला कमी पशात कुटुंब चालवून बचत करते आणि हीच बचत अडचणीच्या काळात कुटुंबाचा आधार ठरते. महिलाशक्तीला सक्षम केल्याशिवाय राज्य व देश पुढे जाऊ शकत नाही. या साठी ग्रामविकास विभागाच्या वतीने जीवनोन्नती अभियानातून बचतगटातील महिलांना आíथकदृष्टय़ा सक्षम करण्याचा आणि युवा-युवतींना छोटय़ा-मोठय़ा उद्योगांचे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध केली जाणार आहे, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेतून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना जलसिंचन विहीर, बचतगटांना अर्थसाह्य़ वाटप करण्यात आले.

Story img Loader