छत्रपती संभाजीनगर – फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाटा येथील राजेंद्र फायबर कॉटन जिनिंगला सोमवारी रात्री ९ च्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत २ हजार ८oo ते ३ हजार क्विंटल कापूस – ज्याची किंमत २ कोटी ३२ लाखांच्या आसपास असल्याची प्राथमिक माहिती आहे.
राहुल प्रमोद नहार हे वरील जिनिंगचे मालक असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. विभागाला ९.१० वाजता जिनिंगला आग लागल्याचा फोन आला. तातडीने सिडकोतील एन-९ मधील अग्निशमन विभागाचे वाहन अधिकारी हरिश्चंद्र पवार, रवी हरणे, रामेश्वर बमणे, नागेश जाधव व चालक विठ्ठल गावंडे खामगाव फाट्याच्या दिशेने रवाना झाले.
सिल्लेखाना भागात घराला आग
छत्रपती संभाजीनगर येथील कांती चौक पासून जवळच असलेल्या सिल्लेखाना परिसरात एका पत्र्याच्या घराला आग लागली. पदमपुरा अग्निशमन विभागाला सोमवारी रात्री आठ वाजता कळवण्यात आले.