सुहास सरदेशमुख लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
छत्रपती संभाजीनगर : पर्यटकांचे आकर्षणस्थळ असणाऱ्या वेरुळ आणि अजिंठा येथील लेणी पाहणीसाठी परदेशी पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरअखेपर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे. वेरुळमध्ये गेल्या वर्षी केवळ चार हजार ५१ परदेशी पर्यटक आले होते. ती संख्या या वर्षी नोव्हेंबरअखेपर्यंत १८ हजार ६६९ म्हणजे चार पटींनी वाढली आहे. मात्र, ही संख्या अजिंठा लेणीपर्यंत जाताना निम्म्याहून कमी होत असल्याचे दिसून आले आहे. वेरुळच्या तुलनेत मार्च ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये केवळ सहा हजार २७८ परदेशी पर्यटकांनी भेट दिली. दोन जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळी पोहचणाऱ्या परदेशी पर्यटक संख्येतील फरक तिपटीपेक्षा अधिक आहे.
‘इंडियन टूर ऑपरेटर’ च्या वतीने घेण्यात आलेल्या परिषदेनंतर अजिंठय़ाकडे जाणारा रस्ता हा परदेशी पर्यटक पोहचण्यातील प्रमुख अडथळा बनला असल्याची माहिती पर्यटन विभागाकडे देण्यात आली होती. पर्यटनाला पूरक असणाऱ्या हवाई वाहतुकीच्या सुविधांमध्येही वाढ करण्याची शिफारस या संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. परदेशी पर्यटकांसाठी स्वच्छ व परदेशी पद्धतीचे स्वच्छतागृह हवे, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, त्यात फारशा सुधारणा झाल्या नाहीत. या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे इंडियन टूर ऑपरेटर असोसिएशनचे जसवंत सिंग म्हणाले.
हेही वाचा >>> कैद्यांच्या उपाहारगृह सुविधांमध्ये वाढ, १६७ वस्तू खरेदीची मुभा
छत्रपती संभाजीनगर शहरापासून काही अंतररावर असणाऱ्या वेरुळमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. येथील अभ्यागत केंद्रही आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले असून त्याचे स्वरूप आकर्षक असल्याचे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी सांगितले. दोन पर्यटनस्थळांमधील गळतीची तुलना करता येणार नाही. कारण प्रत्येक ठिकाणी भेट देणारा पर्यटक वेगळा असतो. पर्यटकांची संख्या वाढते आहे, ही मात्र चांगली बाब असल्याचे सांगण्यात येते. वेरुळमध्ये १८ हजार ६६९ परदेशी पर्यटकांच्या तुलनेत औरंगाबाद लेणीमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या केवळ ६१६ एवढी आहे. याचा अर्थ या लेणींची माहितीच दिली जात नसल्याचे दिसून येते. पर्यटनाला चालना देण्यासाठी सुविधांमध्ये वाढ करतानाच त्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशात पर्यटकांची संख्या कमी होत आहे. २०१९ मध्ये ३.१४ कोटी परदेशी पर्यटक भारतात पर्यटनस्थळी आले होते. २०२२ मध्ये ही संख्या ८५.९ लाख एवढी घसरली. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. परदेशात पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी आयोजित करावयाच्या दौऱ्यासाठी पुरेसा निधीच नसतो. इंडियन टूर ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथे घेतलेल्या कार्यशाळेनंतर वेरुळ आणि अजिंठा या पर्यटनस्थळांना भेटी द्याव्यात असे प्रोत्साहन दिले आहे. पण सरकारने या भागातील काही अडचणी दूर करणे आवश्यक आहे.
– राजीव मेहरा, अध्यक्ष, इंडियन टूर ऑपरेटर्स
मार्च ते नोव्हेंबर २०२२ मध्ये पाच ठिकाणी एकूण १० हजार १३३ परदेशी पर्यटकांनी भेट दिली.
मार्च ते नोव्हेंबर २०२३ मध्ये पाच ठिकाणी एकूण ३५ हजार ६१८ परदेशी पर्यटकांनी भेट दिली.