औरंगाबादनजीक गोलवाडी येथील मैदानावर अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी सर्व आरोपींना पकडण्यात औरंगाबाद पोलीसांनी बुधवारी यश आले. पोलीसांनी मंगळवारी रात्री उशीरा मच्छिंद्र गायकवाड, रुपचंद तिरके आणि शेख सत्तार या तीन आरोपींना अटक केली होती. बुधवारी सकाळी बबन सोनावणे या आणखी एका आरोपीला पकडण्यात आले.
मित्रासोबत सोमवारी संध्याकाळी गोलवाडी येथील मैदानावर फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी सामुहिकपणे अत्याचार करीत बलात्कार केला होता. मुलीच्या तक्रारीनंतर या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी मुलीसोबत असलेल्या तिच्या मित्रालाही मारहाण केली होती. पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलीसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यासाठी गोलवाडी जवळील सर्व भागात कसून तपास करण्यात आला. तिसगाव, पडेगाव, दौलताबाद, पंढरपूर येथे विविध ठिकाणी पोलीसांनी कारवाई करून आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर बुधवारी चारही आरोपींना पकडण्यात पोलीसांनी यश आले.

Story img Loader