लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनकरवाडी तलावात गुरुवारी सायंकाळी चार मुले बुडाली. चारही मुले १२ ते १५ वयोगटातील असून त्यांना रात्री अग्निशमन दलाच्या पथकाकडून बाहेर काढण्यात आले.

बिश्वजीतकुमार सुखदेव उपाध्ये (१२), अफरोज जावेद शेख (वय १४), अबरार जावेद शेख (१२) व एकाची ओळख रात्रीपर्यंत ओळख पटली नसल्याची माहिती वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. घटनास्थळी झोन १ चे पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक आघाव व त्यांचे पथक व तहसीलदार सोनी हे दाखल झाले होते. चारही मुलांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

Story img Loader