गॅरेजमध्ये असलेल्या वेल्डिंग गॅस सिलिंडरवर वीजवाहक तार तुटून पडल्याने गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेत चार जण ठार, तर अन्य एक गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास वसमत तालुक्यातील हट्टा येथील जनता गॅरेजमध्ये ही भीषण दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत एक जण जागीच ठार, तर चार जखमींपकी तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमीवर परभणीच्या रुग्णालयात उपचार सुरू असून हट्टा पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली. िहगोली-परभणी रस्त्यावर हट्टा येथे बसस्थानक परिसरात हे गॅरेज आहे. गॅरेजवरून वीज प्रवाह घेऊन जाणारी तार तुटून गॅरेजमध्ये असलेल्या वेल्डिंग गॅस सिलिंडरवर पडल्याने गॅसचा स्फोट झाला. यात रहीमखाँ गुलाबखाँ पठाण (वय ४०) यांचा गंभीर रीत्या भाजून जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण भाजल्याने गंभीर जखमी झाले.
जखमींना तत्काळ परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, शेख अतीक शेख इसाक (वय ३०), गुलामखाँ जवाहरखाँ पठाण (वय ६७) व अजिजखाँ रहीमखाँ पठाण (वय ९) या तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमी तान्हाजी हरिभाऊ जाधव (वय २७) यांच्यावर परभणीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौघांच्या मृत्यूसोबतच जनता गॅरेजचे जळून मोठे नुकसान झाले.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील रसाळ ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. जमलेल्या लोकांच्या मदतीने त्यांनी चार जखमींना परभणीच्या रुग्णालयात हलविले. पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी घटनास्थळास भेट देऊन माहिती घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four died gas cylinder blast