परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शुभमंगल कर्जयोजना, तसेच पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या नावे बनावट दस्तावेज तयार करून आíथक घोटाळा करणाऱ्या बँकेच्या १० कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. या बरोबरच खेर्डा सोसायटीचे अध्यक्ष व संचालक मंडळ तसेच त्या १० बँक कर्मचाऱ्यांवरही फसवणुकीबाबत फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्षवेधीच्या उत्तरात दिले.
जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामधील खेर्डा सहकारी सोसायटीने वाटप केलेल्या शुभमंगल विवाह कर्जयोजनेसह पीककर्ज वाटपात बनावट दस्तावेज तयार करणे, खोटे सात-बारा व खोटय़ा लग्नपत्रिका तयार करणे, शेती नसणाऱ्यांच्या नावे पीककर्ज उचलणे असे गरप्रकार करीत खेर्डा येथील विजय सिताफळे यांनी अध्यक्षपदाचा दुरूपयोग केला. तसेच बँकेसही फसविले. त्यांना साह्य़ करणारे सोसायटीतील संचालक, बँकेचे व्यवस्थापक, निरीक्षक, विभागीय अधिकारी आदींनी संगनमत करीत लाखो रुपयांचा घोटाळा केल्यावरून त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे नोंदवावेत. बँकेची फसवणूक केल्यावरून अधिकाऱ्यांना निलंबित करावे. तसेच फसवणुकीमधील बँकेची वसुली करण्यासाठी दोषींची मालमत्ता जप्त करून जिल्हा बँकेस वाचवावे, अशी लक्षवेधी आमदार बाबाजानी दुर्राणी, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत उपस्थित केली होती. त्यास पाटील यांनी उत्तर दिले.
जिल्हा बँकेतील या घोटाळ्यात अध्यक्ष विजय सिताफळे यांच्यासह संचालक मंडळ, बँक व्यवस्थापक, निरीक्षक यांच्यासह इतर १० अधिकारी, पदाधिकारी यांनी गरप्रकार केल्याबाबत विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था यांनी चौकशी अहवालात स्पष्ट केले. औरंगाबादचे विभागीय सहनिबंधक यांनी वरील दोषींविरुद्ध गुन्हे नोंदविण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हा बँकेचे १० अधिकारी, सोसायटीचे अध्यक्ष विजय सिताफळे व संचालक मंडळ या दोषींविरुद्ध गुन्हे नोंदविण्याबाबत पोलीस अधीक्षक परभणी यांना आजच दूरध्वनीद्वारे व लेखी आदेश देऊन गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तसेच या गरप्रकारास जबाबदार असणारे जिल्हा बँकेतील १० अधिकारी, कर्मचारी यांना आजच निलंबित करण्यात येईल, असे आदेशही त्यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा