औरंगाबाद – पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून गोव्‍याची वृध्‍द महिला व एका व्यक्तीसह तिघांना साडे अकरा लाखांना फसवणाऱ्या भोंदुबाबसह त्‍याच्‍या दोन साथीदारांना गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने शुक्रवारी अटक केली. आरोपींच्‍या ताब्यातून ६० हजारांच्‍या रोख रक्कमेसह एक दुचाकी, तीन मोबाइल असा सुमारे एक लाख २२ हजारांचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला आहे. तिघा आरोपींना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रभारी मुख्य न्‍यायदंडाधिकारी एम.आर. देशपांडे यांनी दिले.

कैलास रामदास सोळुंके (२५) असे भोंदूबाबाचे तर गोरख साहेबराव पवार (२२, रा. शिर्डी) आणि प्रमोद दीपक कांबळे (३१, जवाहर कॉलनी) अशी त्‍याच्‍या साथीदारांची नावे आहेत.प्रकरणात जावेद खान नुर खान (५०, पडेगाव) यांनी फिर्याद दिली. खान हे प्‍लॉटींग खरेदी-विक्रीचा व्‍यवसाय करतात. ते पूर्वी ढाबा चालवित असतांना त्‍यांची ओळख पुष्‍पा ऊर्फ रत्‍नदीप बाळगो गाडेकर (७०, रा. मापासा गोवा) यांच्‍याशी झाली. खान यांनी त्‍यांना बहिण मानलेले आहे. १५ जून रोजी पुष्‍पा गाडेकर आणि महेश ऊर्फ शोधन प्रसाद निपाणीकर (रा. मापसा गोवा) असे दोघे खान यांच्या घरी आले होते. त्‍यावेळी खान यांनी त्‍यांची ओळख प्रमोद कांबळे याच्‍याशी करुन दिली.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

कांबळेने एक मांत्रिक पैशांचा पाऊस पाडून दिलेल्या रक्कमेच्‍या दुप्पट पैसे आपल्याला देतो असे सांगितले. १७ जून रोजी आरोपीने खान यांच्यासह तिघांना वाळुज येथे बोलावून पैशांचा पाऊस दाखवतो असे सांगत विधीवत पुजेचे सामान, सोन्‍याचा मुंजा यासाठी खान यांच्याकडून दोन लाख रुपये, पुष्पा गाडेकर यांच्‍याकडून पाच लाख ९० हजार रुपये व शोधन निपाणीकर यांच्‍याकडून तीन लाख ६० हजार रुपये असे सुमारे ११ लाख ६२ हजार रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांना भेटून तक्रार दिली. सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठोळे यांनी आरोपींना पोलीस कोठडी