लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळील बिडकीन नजीकच्या शेतशिवारातील ७४ जळगांव येथील गट क्र. १९९. या मध्ये कापूस वेचक महिलेसोबत आलेल्या मुलीला बिबट्याने ठार केले. ही घटना बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.

बिबट्या मुलीला २०० ते ३०० फुटांपर्यंत फरफटत नेत असताना नातेवाईकांच्या वतीने आरडाओरडा व दगडफेक केली. त्यामुळे बिबट्या पसार झाला. मात्र त्याच्या हल्ल्यात प्रणाली मुळे ही मुलगी जागीच मृत्यू पावली, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेची माहिती गांवात पोहचताच गांवकरी व प्रणालीचे कुटुबीय एकत्र आले. त्यांनी प्रणालीला बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषीत केले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl dies in leopard attack in sambhaji nagar mrj