सोन्याच्या दागिन्यांची कारागिरी करणाऱ्या दुकानात शस्त्राचा धाक दाखवून दीड किलो सोने लुटण्यात आले. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकारामुळे सराफ बाजारात घबराट निर्माण झाली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कॅमेराबंद झाला असून लूट करणारे सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरात पश्चिम बंगालमधील चंदन शंकर भौमिक गेल्या २५ वर्षांपासून सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करतात. ते मूळचे पश्चिम बंगालचे आहेत. रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या दुकानात ५-६ तरुण अचानक घुसले व एका कारागीराच्या कानाला पिस्तूल लावले. सर्वाचे हात चिकटपट्टीने पाठीमागे बांधून ठेवले. सर्व सोन्याचा ऐवज पिशवीत भरून दरोडेखोर पसार झाले. माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह अधिकारी घटनास्थळी आले. नाकाबंदी करण्यात आली. मात्र, पोलिसांच्या हाती काही लागले नाही.

Story img Loader