बिपीन देशपांडे

छत्रपती संभाजीनगर : ‘चारा आणि पाण्याची परिस्थिती यंदा फार बिकट आहे. शंभरपेक्षा अधिक पशुधन जगवण्याची चिंता तर आहेच, पण काहीतरी मार्ग काढण्याशिवाय पर्याय तरी काय? चारा देणारेही कोणी आता राहिले नाहीत..’ शिरूर-कासार येथील पद्मश्री पुरस्कार मिळालेले शब्बीर मामूंची ही व्यथा. राज्यातील सहाशेंवर संख्येने असलेल्या गोशाळांची अशीच परिस्थिती आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीची सर्वाधिक झळ गोशाळांना बसत असून, चारा आणि पाणीटंचाईचे नियोजन कसे करावे, या चिंतेने गोशाळा चालकांना ग्रासले आहे.

Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

चाराटंचाईबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, यासाठी गोसेवा आयोगाची बैठक मंगळवारी पार पडली. राज्याचे महसूलमंत्री, पशुसंवर्धन मंत्र्यांना पत्र देण्यात आले आहे. राज्यात सहाशेंवर गोशाळा असून त्यामध्ये वृद्ध, भाकड व  अपघातग्रस्त, असे दोन लाखांपेक्षाही अधिक पशुधन असल्याची माहिती गोसेवा आयोगाचे सदस्य तथा गोशाळा महासंघाचे संयोजक डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी दिली.

हेही वाचा >>> जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; स्थगितीची मागणी फेटाळली

 दुष्काळी परिस्थितीत चारा-पाणीटंचाईचा सामना करत पशुधन जगवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना पेंडी, सुग्रास आदी पशुखाद्याचेही दर भडकले आहेत. एका पेंडीचा दर ३० रुपयांपर्यंत असून दिवसभरात एका पशुधनास किमान तीन ते चार पेंडय़ा तरी चारा देणे आवश्यक असते. सुग्रासही ३० ते ३५ रुपये किलोंच्या दरम्यान आहे. सोयाबीनचा भुसा १० रुपये किलोने तर उसाचे वाढे २ ते ३ हजार रुपये टन, या दराने खरेदी करावे लागत आहेत.

‘‘साधारणपणे एका पशुधनाला जगवण्यासाठी १५ ते २० किलो चारा लागतो. त्यासाठी एका पशुधनामागे किमान दोनशे रुपये खर्च येतो. गोशाळांसाठी दान तरी कोणाकडे मागावे. दान देणारा वर्गही मोजकाच आहे. प्रत्येकवेळी दान देणाऱ्यांकडे जाणेही योग्य वाटत नाही. चाऱ्याची चिंता मात्र सतावते आहे’’, असे पाथरीजवळच्या रामेटाकळी येथील गोशाळा संचालक माणिक रासवे गुरुजी यांनी सांगितले.

शिरूर कासार हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. सिंदफणा तलाव तेवढा भरलेला आहे. उर्वरित सर्व तलाव कोरडेठाक आहेत. तलावाच्या भरवशावर ऊसाची लागवड झाली आहे. चारा मिळणाऱ्या धान्याचा पेरा कमी झाल्याने चाऱ्याचा प्रश्न आहे. वन्यजीवांबाबत दुष्काळी परिस्थिती पाहून चिंता वाटते, असे सर्पराज्ञी संस्थेचे सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले.

गोसेवा आयोगाची बैठक मंगळवारी पुण्यात झाली. यामध्ये गोशाळांच्या चारा टंचाईसह इतर प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. यासंदर्भाने राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन मंत्र्यांना पत्र देण्यात आले.

डॉ. सुनील सूर्यवंशी, सदस्य, गोसेवा आयोग

सध्या पशुधनाला रानावनांमध्ये नेऊन चाऱ्याची गरज भागवली जाते. चाऱ्याची चिंता बिकट होत आहे. पाणीटंचाईचाही प्रश्न आहे.

– पद्मश्री शब्बीर मामू