|| बिपीन देशपांडे

कर्नाटकातील घटनेचे पडसाद

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
pimpri chinchwad construction timing
पिंपरी : बिल्डरांना ‘या’ वेळेत बांधकाम करता येणार नाही; महापालिकेकडून नियमावली जारी
Pimpri Chinchwad Municipal Corporation,
पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर कारवाई
Minister Expenditure , Officer nagpur winter session ,
अधिवेशन काळातील ‘त्या’ उधळपट्टीला आवर, खातेवाटप न झाल्याने अधिकारीही सुखावले
Hinjawadi, Pimpri Chinchwad Municipal Corporation ,
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयटीनगरी हिंजवडीसह सात गावांचा समावेश का रखडला?
The tradition of gaapalan in the village of Achra near Malvan
मालवणजवळील आचऱ्यात परंपरागत ‘लॉकडाऊन’!
Opposition MVA to boycott Maharashtra govt tea party
विरोधी पक्षाने ही कारणे देत टाकला चहापानावर बहिष्कार

औरंगाबाद : कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत असतानाच औरंगाबादमध्ये मात्र, गेल्या तीन दिवसांत त्याची विक्री दुप्पट झाली आहे. विक्रेते हिजाब खरेदीवर आता १० ते २० टक्के सवलतही देत आहेत.

औरंगाबादमधील गुलमंडी, सिटी पोलीस चौक परिसरात बुरखा, हिजाब विक्रीची २५ ते ३०, तर इतर भागांत मिळून शंभरावर दुकाने आहेत. गुलमंडी हा औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात येणारा भाग मुस्लीमबहुल आहे. २०१९च्या मतदार नोंदीनुसार या मतदारसंघात एक लाख ५७ हजार ४३६ एवढी महिला मतदारांची संख्या आहे. इतरही भागातील मुस्लीम महिला गुलमंडी परिसरातच बुरखा, हिजाब खरेदीसाठी येतात.

 सिटी चौकात बुरखाविक्रीचे दुकान असलेले तरुण व्यावसायिक इम्रानखान, शेख वहीद आणि मुदस्सीर खान यांनी गेल्या दोन-तीन दिवसांत हिजाब खरेदी दुपटीने वाढल्याचे सांगितले.

 तीन दिवसांपूर्वी दिवसभरात एका दुकानातून ५०च्या आसपास हिजाब, बुरख्याची खरेदी होत होती. सध्या हिजाबचा विषय देशभर चर्चेत आल्याने खरेदीकडे कल वाढू लागला असून बाजारपेठेतील गणितानुसार व्यवसाय वाढवण्यासाठी सवलत देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. एरवी दीडशे रुपयांना विक्री होणारा हिजाब शंभर सव्वाशे रुपयांपर्यंत दिला जात  आहे.

Story img Loader