औरंगाबाद : आर्थिक देवाण-घेवाणीतून झालेल्या वादातून गृहरक्षक दलाच्या जवानाचा (होमगार्ड) खून करण्यात आला. शहरातील किराडपुरा भागात बुधवारी रात्री ही घटना घडली. काझी शफी अहमद (रा. नागसेन कॉलनी) असे मृत जवानाचे नाव आहे. या प्रकरणी जमील खान याला जिन्सी पोलिसांनी घटनेनंतर तासाभरात अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृत काझी आणि जमील खान हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. जमील हा कंत्राटदार असून तो व्याजाने पसे देत होता. काही दिवसांपूर्वी काझी व आरोपी जमील यांच्यात आíथक व्यवहार झाला होता. होमगार्ड असलेल्या काझी यांची आíथक परिस्थिती नसल्याने त्यांनी जमीलचे पसे वेळेत परत केले नव्हते. त्याचा राग जमीलच्या डोक्यात होता. बुधवारी रात्री दोघे किराडपुरा भागातील औरंगाबाद टी सेंटरमध्ये भेटले. त्यांच्यात पशांच्या देण्याघेण्यावरून शाब्दिक वाद झाला. दरम्यान राग विकोपाला गेल्याने जमील याने जवळच्या चाकूने हॉटेलमध्येच काझीवर हल्ला केला. दरम्यान जखमी अवस्थेत काझी बाहेर पडला असता बाहेरही जमीलने त्याच्यावर वार केले. काझी यांना जवळच्या खासगी रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी सूत्रे हलवत जमीलला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक शामसुंदर वसुरकर, सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय पवार आणि कर्मचारी दाखल झाले होते.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home guards jawan murder in aurangabad