छत्रपती संभाजीनगर – बीड शहरातील वृंदावन काॅलनीत पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना समोर आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर : बोगस मतदान प्रकरणी सहा जणांवर गुन्हा
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी रोकड जप्त
मृत दाम्पत्याची पाच वर्षांची मुलगी रडत असल्याच्या आवाजावरून शेजाऱ्यांनी धाव घेतली असता घटनेचा उलगडा झाला. राधा भागवत वायभट (वय ३०), असे खून झालेल्या महिलेचे नाव तर भागवत वायभट आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वायभट हे दाम्पत्य हे लिंबागणेश येथील मूळचे रहिवासी असून त्यांना तीन लहान मुले आहेत. भागवत वायभट हा पीकअप वाहन चालवून उदरनिर्वाह करत होता. कौटुंबिक कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि त्यातूनच ही घटना घडल्याची माहिती पुढे येत आहे.
First published on: 13-05-2024 at 22:19 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband commits suicide by murdering his wife incident in beed city ssb