छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या वाघबेट येथे बोअर खोदून परत येणाऱ्या वाहनाचा प्रवाहित वीजवाहिनीला स्पर्श होऊन उतरलेल्या विजेच्या धक्क्याने दोन मजुरांचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गोबिंदा जबलसिंग गौंड (वय४२) व सरदीप डाक्टर गौंड (वय १८), अशी मृतांची नावे असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार रमेश तोटावाड यांनी दिली. मृत व जखमी मजूर हे ओडिशा राज्यातील असल्याची माहिती आहे. मृत्यू पावलेल्या मजुरांचे मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. तर तेथेच दोन जखमींवर उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : महाराष्ट्रातील सर्वात कमी कुणबी नोंदी मराठवाड्यात

वाघबेट येथे पाण्याचा बोअर पाडण्यासाठी ओडिशा राज्यातील मजुरांसह बोअरवेल यंत्राचे वाहन मागवण्यात आले होते. या वाहनात सहा जणांचे एक पथक आले होते. या गावातील बोअर खोदण्याचे काम संपल्यानंतर वाहन परळी शहराकडे येत होती. रस्त्यात वीजवाहक तारांना या वाहनाचा स्पर्श झाला. वीज वाहकतारांचा विद्युत प्रवाह संपूर्ण लोखंडी पाईप असलेल्या या गाडीत उतरला. या गाडीमध्ये एकूण सहा मजूर बसलेले होते. त्यापैकी करंट लागून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान या वाहनाच्या चालकाच्या निष्काळजीपणाने हा अपघात घडला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.