छत्रपती संभाजीनगर – बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दुपारी अपहरण केल्यानंतर सायंकाळी त्यांचा मृतदेह पोलिसांच्या पथकाला आढळून आला. यानंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केज पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालय परिसरात धाव घेतली. संतोष देशमुख यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती असून, मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

संतोष देशमुख यांचा मृतदेह सोमवारी सायंकाळी केज – नांदूरघाट मार्गावरील दहिटना फाट्यावर आढळून आला. संतोष देशमुख व त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे ९ डिसेंबर रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडी क्र. (एम एच ४५/बी ३०३२) मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी शिवराज देशमुख हे गाडी चालवत होते. ते केज येथून मस्साजोगकडे जात असतांना डोणगाव फाट्याच्या जवळ असलेल्या टोलनाक्याजवळ एका काळ्या रंगाची स्कार्पिओ क्र. (एम एच ४४/झेड ९३३३) आडवी लावली. त्या गाडीतून सहा व्यक्ती खाली उतरले. त्यातील एकाने दरवाज्याची काच दगडाने फोडुन गाडीत पाहिले व दुसऱ्या डाव्या बाजुला जावुन सरपंच संतोष देशमुख यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. अपहरणकर्त्यानी त्यांना सोबत आणलेल्या स्कार्पिओमध्ये त्यांना बळजबरीने बसवुन केजच्या दिशेने भरधाव निघुन गेले.

navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Aditya Thackeray Nana Patole Said This Thing
Mahavikas Aghadi : विधानसभेत महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, आदित्य ठाकरे, नाना पटोले काय म्हणाले?
pune crime news
पुणे : कल्याणीनगर भागांतील हॉटेलमध्ये धांगडधिंगा, हॉटेल मालकांवर गुन्हे
bjp focusing to make india free from regional parties
लालकिल्ला : भाजपला प्रादेशिक पक्षांची भूक!
After failure in assembly elections internal dispute in Maharashtra Navnirman Sena come to fore
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Maharashtra government formation buldhana
मंत्रिपदासाठी भाजपकडून ज्येष्ठता की धक्कातंत्राचा अवलंब?
Five candidates related to sugar factory district bank defeated in Pune
सहकार क्षेत्रातील पराभूतांपुढे आव्हान

अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दोन पोलीस पथके तपासाठी रवाना केले होती. पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूरघाट रस्त्यावर दहीटना फाटा येथे मिळून आला. मृताच्या अंगावर मारहाणीचे व शास्त्राचे वार आहेत. पोलीसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणला आहे. तेथे रात्री मोठा जमाव दाखल झाला आहे.

६ डिसेंबर रोजी मस्साजोग येथे अवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असलेले सुरक्षा रक्षक हे मस्सा जोग येथील असल्याने सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप करून मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यानी त्यांचा खून केल्याचा आरोप होत आहे.

Story img Loader