छत्रपती संभाजीनगर : शहराजवळील वाळूजमधील बजाज कंपनीच्या परिसरात एका सुरक्षारक्षकाचा निर्घृण खून करण्यात आला. तर पैठण तालुक्यातील आपेगाव येथे एका पतीने पत्नीला धारदार शस्त्राने वार करून संपवले. या दोन्ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्या. भाऊसाहेब पडळकर (वय ५४) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. ते रात्रपाळीसाठी कर्तव्यावर होते. मूळचे जालना जिल्हयातील रहिवासी असून येथील श्रद्धा काॅलनीत अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. घटनास्थळी वाळूज एमआयडीसीचे निरीक्षक कृष्णा शिंदे, सातारा पोलीस ठाण्याचे ब्रह्मा गिरी आदींनी भेट देऊन पाहणी केली. तेथे जाळपोळीसारखा प्रकार आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
हेही वाचा : बीडजवळ पाच ते सहा वाहनांचा अपघात; तीन ठार
आपेगाव येथील घटनेत मनीषा ज्ञानेश्वर प्रव्हणे, असे मृत विवाहितेचे नाव आहे. ज्ञानेश्वर प्रव्हणे हा सतत दारू पिऊन मनीषाशी भांडण करत होता. रविवारी मध्यरात्री त्याने मनीषाचा खून केल्याचे तिचे वडील कैलास नारायण नवगिरे (रा. चांगतपुरी) यांनी पैठण पाेलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
© The Indian Express (P) Ltd