छत्रपती संभाजीनगर : आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगावातील घरावर ३० ऑक्टोबर रोजी दगडफेक व जाळपोळ केल्याप्रकरणात संशयित म्हणून अटक केलेल्या १७ जणांना माजलगावचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश भास्कर जी. धर्माधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे. यातील बहुतांश संशयित हे ३० ते ४५ दिवसांपासून जिल्हा कारागृहात आहेत.
हेही वाचा : श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा : विश्व हिंदू परिषदेतर्फे घरोघरी ‘भाव जागरण’
माजलगाव येथे मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू असतानाच आमदार सोळंके यांच्या बंगल्यावर तुफान दगडफेक केली. त्यानंतर काही वेळाने संपूर्ण बंगला जाळून टाकण्यात आला होता. जमावाने पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत यांच्या वाहनावरही दगडफेक केली होती. याप्रकरणी २० जणांवर गुन्हा नोंद केला. खंडपीठात प्रमोद सोळंके या संशयितालाही जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर १७ जणांनाही जामीन मंजूर करण्यात आला.