छत्रपती संभाजीनगर: बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टिस्टेट का. ऑप. क्रेडिट साेसायटीचा अध्यक्ष सुरेश कुटे, अर्चना सुरेश कुटे व १८ संचालक, मध्यस्थांनी करमाड शाखेअंतर्गत परिसरातील २०० ठेवीदारांची ४ कोटी १६ लाख १४ हजार ३२८ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कारण राजकारण : ‘मागच्या बाकांवरील’ सावेंची मतदारसंघात अडचण

याप्रकरणी दुधड येथील शेतकरी पांडुरंग शेषराव चौधरी (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीवरून सुरेश ज्ञानोबा कुटे, अर्चना सुरेश कुटे, यशवंत वसंतराव कुलकर्णी, वसंत शंकरराव सटाले, आशिष पद्माकर पाटोदेकर, दादाराव हरिदास उदरे, वैभव यशवंत कुलकर्णी, आशा पद्माकर पाटील, कैलास काशिनाथ मोहते, रवींद्र मधुकर तालबे, शिवाजी रामभाऊ पारस्कर, रेखा वसंतराव सटाले, रघुनाथ सखाराम खरसाड, रवींद्र श्रीरंग यादव, सचिन रामनाथ लाखे, चाळक, सिद्धेश्वर किशोर खंदारे व नारायण सुगंधराव शिंदे (सर्व रा. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१६ ते २०१७ पासून नियमितपणे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ठेवीदारांना जास्तीचे व्याजदर देण्याचे आमिष दाखवून २०० ठेवीदारांची फसवणूक करून व नोव्हेंबर २०२३ पासून करमाडमधील शाखा बंद करून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chhatrapati sambhajinagar case against 18 in dnyanradha multistate co op fraud suresh kute css