छत्रपती संभाजीनगर : अवसायनामधील संस्था बाहेर काढण्यासाठी ५० हजार लाचेची मागणी करून तडजोडीअंती ठरलेल्या ३० हजारांपैकी १० हजार स्वीकारणारा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयातील सहकार अधिकारी (श्रेणी-२, वर्ग ३) भारत किशनराव झुंजारे (वय ४८) हा शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. निराला बाजार परिसरातील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. भारत झुंजारेविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : उस्मानाबाद लोकसभेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण, विधानसभानिहाय १४ टेबलवर १५५ फेर्या
याप्रकरणातील तक्रारदारांची न्यू सम्यक मागसवर्गीय आैद्योगिक उत्पादक सहकारी संस्था आहे. मात्र, संबंधित संस्था ही छत्रपती संभाजीनगर उपनिबंधक तालुका स्तराने अवसायनात काढली आहे. यातून संस्था बाहेर काढण्यासाठी भारत झुंजारेने ५० हजारांची मागणी करून ३० हजारांवर तडजोड केली होती. पोलीस उपअधीक्षक गाेरखनाथ गांगुर्डे यांच्या पथकाने सापळा लावला होता.