छत्रपती संभाजीनगर : बीड बाह्यवळण रस्त्यावरील एक हॉटेलला शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग सिलेंडरच्या स्फोटामुळे लागल्याचे सांगितले जात आहे. एक वाहन घटनास्थळी तातडीने दीपराज गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी रवाना झाली आहे.
आग विझवण्याचं काम सुरू असून अद्याप अधिक तपशील मिळू शकला नाही, असे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पदमपुरा अग्निशमन केंद्राकडून सांगण्यात आले.
घटनास्थळी प्रचंड मोठी गर्दी झाली असून समोरील मार्ग एका बाजूने वळवण्यात आला आहे. आग लागलेल्या हॉटेलच्या बाजूला धनलक्ष्मी मोटर्स व अन्य दुकाने असून, समोरचा मार्ग रहदारीचा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी पहाटे आझाद चौकातील लाकडी फर्निचर व स्टीलचे साहित्य तयार करणारी १८ दुकाने जळून बेचिराख झाली असून, त्याचे निखारे शमत नाही तोवरच दुसरी घटना समोर आली.