छत्रपती संभाजीनगर : हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. कारागृहामागील बाजूसच खून झालेल्या पाेलिसाचा मृतदेह आढळून आला. सिद्धार्थ बन्सीलाल जाधव (वय ४२), असे मृत पोलिसाचे नाव असल्याची माहिती हर्सूल पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी दिली.

खुनाच्या घटनेमागचे नेमके कारण सोमवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी रक्ताचे डाग दिसून आले. यातून ठेचून खून करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून मृत सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र सचिन दाभाडेही या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत. सचिन दाभाडे व मृत सिद्धार्थ जाधव हे दोघे कारागृहाच्या मैदानावर एकत्र बसले हाेते. त्याच दरम्यान, हल्ला झाला.

हेही वाचा : अर्चना पाटील सर्वाधिक सुवर्णसंपन्न महिला उमेदवार

सिद्धार्थला ठेचून मारले तर सचिन यांनाही मारताना ते बचावासाठी पळाले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक मिसाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह घाटीत हलवला. मृत सिद्धार्थ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे

Story img Loader