धाराशिव : माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा तथा माजी राज्यमंत्री तुळजापूर भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रूपाली चाकणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अर्चना पाटील यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उस्मानाबाद लोकसभेचा महायुतीचा उमेदवार म्हणून अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीच्या वतीने आठवडाभरापूर्वी आमदार खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र महायुतीचा उमेदवार कोण यावरून जिल्हाभरात मोठी चर्चा सुरू होती अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे तथा राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नावाची प्राधान्याने चर्चा सुरू होते या सर्व बाबींना मागे सरक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी मिळाविण्यात अर्चना राणा जगजीत सिंह पाटील यशस्वी झाले आहेत घड्याळ तीच वेळ नवी अशा घोषवाक्यसह त्यांच्या उमेदवारीचे जिल्हाभरातून स्वागत केले जात आहे.

हेही वाचा : एकेकाळचे ‘डीलर’ आता भाजपासाठी झाले ‘लिडर’

आता महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यात म्हणजे दीर- भावजयीमध्ये थेट लढत होणार आहे. उस्मानाबाद लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मागील दोन विधानसभा आणि एक लोकसभा आशा एकूण तीन निवडणुकीत आमदार रणाजगजितसिंह पाटील व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात लढत झाली होती. दोन भावांमध्ये झालेल्या दुरंगी लढतीत विधानसभा निवडणुकीत दोघांचाही एकवेळा पराभव झाला होता. आता पहिल्यांदाच दीर विरुद्ध भावजय अशी चुरशीची लढत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. होणार आहे. अर्चनाताई पाटील यांनी मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार अभिमन्यू पवार, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार रणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदींची उपस्थिती होती.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dharashiv daughter in law of padmasinha patil archana patil joined ncp ajit pawar faction css
Show comments