धाराशिव: महायुतीच्या उमेदवारीवरून सुरू असलेला गोंधळ आता आणखी नाट्यमय वळणावर येऊन थांबला आहे. जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या सर्वात महाशक्तीशाली असलेल्या महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे आघाडीच्या ओम राजे यांचे आव्हान रोखण्यासाठी कोणत्या हुकमी चेहऱ्यावर महायुती विसंबून आहे हे अद्यापही स्पष्ट नाही. माजी मंत्री बसवराज पाटील, प्रविणसिंह परदेशी, सुरेश बिराजदार, आमदार विक्रम काळे आशा अनेक दिग्गज मंडळींच्या नावानंतर आता आमदार रणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. अद्याप त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले तरी पुन्हा एकदा एकमेकांचे पारंपरिक विरोधक असलेल्या पाटील आणि राजेनिंबाळकर यांच्यात लोकसभा निवडणुकीचा आखाडा रंगणार असे चित्र आहे.

आजवर झालेल्या एकूण १७ लोकसभा निवडणुकीत तब्बल ११ वेळा काँग्रेस पक्ष विजयी झाला. पाचवेळा शिवसेनेने या मतदारसंघात विजय मिळविला तर केवळ एक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ विजयी झाले. या १७ लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर विजयी झालेल्या कल्पना नरहिरे या एकमेव महिला खासदार राहिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण ढोबळे यांचा २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ एक हजार सहाशे मतांनी पराभव करत जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार म्हणून विजयी होण्याचा बहुमान त्यांच्या नावावर कोरला गेला. आरक्षित मतदार संघातील ती शेवटची निवडणूक होती. त्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघ खुला झाला. मतदारसंघाची पुनर्रचना झाली. करमाळा विधानसभा मतदारसंघ वगळला गेला आणि औसा मतदारसंघाचा समावेश लोकसभा मतदारसंघात झाला.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?

हेही वाचा : पस्तीस वर्षात ‘धनुष्यबाण’ चिन्हाशिवाय बालेकिल्ल्यातील शिवसेनेची पहिलीच निवडणूक

मतदारसंघ खुला झाल्यानंतर होत असलेली ही चौथी निवडणूक आहे. त्यापैकी तीन निवडणुकीत एकवेळा राष्ट्रवादी तर दोन वेळा शिवसेना पक्षाला लोकसभा जिंकण्यात यश आले होते. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांचा पराभव केला. २०१४ साली मोदींच्या नावाची मोठी लाट होती त्यात डॉ. पाटील यांना पराभूत करण्यात रवींद्र गायकवाड यांना यश आले. २०१९ साली खासदार असलेल्या रविंद्र गायकवाड यांना डावलून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले ओमराजे यांना उमेदवारी देण्यात आली. डॉ. पाटील यांचे चिरंजीव आमदार रणाजगजितसिंह पाटील आणि ओमराजे एकमेकांसमोरे तिसऱ्यांदा उभे ठाकले होते. त्यापूर्वी दोन विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांना आव्हान दिले होते. २००९ साली शिवसेनेचे ओमराजे यांनी आमदार रणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत आमदार रणाजगजितसिंह पाटील यांनी मागील पराभवाचे उट्टे काढीत ओम राजे यांना धूळ चारीत विजयश्री मिळविली. त्यानंतर पाच वर्षांनी हे दोन्ही प्रतिस्पर्धी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एकदा एकमेकांना आव्हान देण्यासाठी उतरले औसा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य सभेने ओम राजे यांचा विजय सुकर झाला आणि घड्याळ चिन्हावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या आमदार रणाजगजितसिंह पाटील हे पहिल्याच लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले.

हेही वाचा : जरांगे यांच्या निर्णयानंतर ‘मराठा मतपेढी’ ला आकार येण्याबाबत साशंकता

आता चौथ्यांदा दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एकमेकांना आव्हान देण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा भाजपा आमदार रणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर शिवसेनेच्या मशालीला भिडणार आहेत. मतदारसंघात दुसऱ्या महिला खासदार म्हणून अर्चना पाटील स्वतःचे नाव कोरणार की लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मशाल पेटणार हे येणारा काळ ठरवेल. एकंदरीत पुन्हा एकदा जुने पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांना आव्हान देणार असल्याने मतदारसंघातील सगळीच राजकीय समीकरणे आता बदलणार आहेत.

Story img Loader