धाराशिव : परंडा तालुक्यातील भोञा शिवारात सिना नदीच्या पाञात मागील अनेक महिन्यापासून अवैध वाळू उपसा सुरु आहे . या उपसावर नियंत्रण ठेवणाऱ्या महसूल प्रशासनाला सध्या वाळू माफियाच्या दहशतीखाली काम करावे लागत आहे .शनिवारी सीमा ओलांडली . वाळू उपसा करण्याच्या कारणावरून एकाने बंदुकीने गोळी झाडल्याने कमरेत गोळी लागल्याने एक जण गंभीर जखमी तर दुसऱ्या साथीदाराच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याची सिनेस्टाईल घटना घडली आहे . या घटनेने वाळू माफियात मोठी खळबळ उडाली आहे .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बाबत अधिक माहिती आशी की भोत्रा शिवारात सीना नदीच्या पात्रातून वाळु काढण्याच्या कारणावरुन वाळु माफियांच्या दोन गटात कुरबुर झाली एका तरुणावर रिव्हाॕलवर मधुन गोळी झाडल्याने गंभीररित्या जखमी झाला आहे.तर त्याच साथीदार तरुणास जबर मारहाण करीत दगडाने डोक्यास मारुन जखमी केल्याची घटना शनिवार दि.२२ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास भोत्रा शिवरात सीना नदी पात्रात घडली आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथोमपचार करुन गंभीर तरुणास पुढील उपचार्थ बार्शी दवाखाण्यात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा : जरांगे विरुद्ध हाके वाद; राज्य सरकारने ओबीसी आंदोलनाची दखल घेतल्याने जरांगे संतप्त

परंडा तालुका परिसरात मागील कांही महिन्यापासुन महसुल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळुमाफियांची मुजोरी वाढली आहे. त्यातुनच शनिवारी वाळुकाढण्याच्या कारणाहुन गोळीबाराची घटना घडली.यात योगेश हणमंत बुरुंगे वय-२८ रा.माळी गल्ली याच्या कमरेत गोळी मारल्याने गंभीर जखमी झाला आहे.तर कपील आजिनाथ आलबत्ते वय-२४ रा.माळी गल्ली याच्या डोक्यात दगडाने मारहान करण्यात त्यात तो जखमी झाला आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयात डाॕ.आंकुश पवार यांनी प्रथोमचार करुन गंभीर जखमी योगेश बुरुंगे यास पुढील उपचारासाठी बार्शी येथील दवाखाण्यात हलविण्यात आले आहे . गोळीबार झाल्याची माहिती समजताच समर्थक,नातेवाईक,नागरीकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार व सहकारी पोलीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती . या प्रकरणातील आरोपी चैतन्य शेळके , सुजित पवार , निखील घुले फरार आहेत . अरोपींच्या शोधासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरामेठ, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी अरोपींच्या शोधासाठी तीन पोलीस पथक रवाना केली आहेत .

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dharashiv one injured in firing by sand mafia at sina river basin css