हिंगोली : राज्याच्या माजी आरोग्य, समाजकल्याण राज्यमंत्री, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ॲड. रजनी शंकरराव सातव (वय ७५) यांचे रविवारी सायंकाळी अल्पशा आजाराने नांदेड येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या काँग्रेसचे दिवंगत नेते ॲड. राजीव सातव यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : नांदेड : मराठा आंदोलन पेटले; आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाहनाची तोडफोड
रजनी सातव यांच्या मागे स्नुषा आमदार डॉ. प्रज्ञा सातव, दोन नातवंडे असा परिवार आहे. रजनी सातव या १९८० ते ९० कळमनुरीतून विधान सभेत तर १९९४ ते २००० या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेच्या आमदार होत्या. त्या मूळच्या पुण्याच्या होत्या.
First published on: 18-02-2024 at 21:52 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In hingoli former state minister and mother of rajeev satav adv rajani satav passes away css